Tuesday, January 12, 2021

                                   ग्रंथ माझे गुरु! ग्रंथ कल्पतरू!

                                   सौख्याचे सागरू! ग्रंथ माझे !

                 असे ग्रंथाविषयी म्हंटले जाते. ग्रंथांना गुरुचे ही गुरु असे संबोधले जाते. ज्ञान साधना आणि संशोधनात्मक दृष्टी विकसित करण्याच्या कामी ग्रंथालयांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे त्याचा परिणाम ग्रंथालया वर ही झाला आहे. नवीन ग्रंथालयाचे स्वरूप हे संगणकीय होते आहे. इंटरनेट आज एका क्लिक वर हवी असलेली माहिती त्वरित मिळते त्यामुळे माहितीचा शोध शक्य होतो. प्रत्यक्ष ग्रंथालयांमध्ये न जाता सुद्धा ज्ञानमाहिती आणि ग्रंथांचा खजिना एका क्लिकवर आपल्या हाती घेऊ शकतो. आज संपूर्ण जगामध्ये डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना आलेली आहे. डिजिटल ग्रंथालयाचे सहाय्याने तुम्हाला जगभरातील अनेक ग्रंथ हे ग्रंथालय मधून वाचता येणे शक्य झाले आहे. वेळेची बचत व त्वरित उपलब्धता या दोन्ही गोष्टी याठिकाणी मोलाच्या आहेत. विद्यार्थ्यांना कमीत कमी वेळेत योग्य ते वाचनसाहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आणि ज्ञान साधनाचा वाढलेला आवाका प्रकाशनाची प्रचंड उपलब्धता, माहितीतील वाढ लक्षात घेता ब्लॉग रुपी तंत्र कौशल्याचा वापर उपयुक्त ठरेल या भावनेने ब्लॉग निर्मितीचा प्रयत्न केला आहे.

               या ब्लॉगच्या माध्यमातून ई -बुक, ऑडिओ बुक महत्वाच्या लिंकउपक्रमांची माहिती अशा विविध प्रकारच्या ई संसाधनांचा आपल्या सर्वांच्या सोयीसाठी एकाच जागी उपलब्ध केले आहे. ग्रंथालयाचे नियमग्रंथालयात उपलब्ध सोयी-सुविधा या सर्व बाबी येथे दिल्या आहेत तरी या ब्लॉगचा अधिकाधिक वापर करावा.

       या ब्लॉगच्या निर्मितीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पांडुरंग गायकवाड साहेब तसेच महाविद्यालयातील सहकाऱ्यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य लाभले. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि या ब्लॉग मध्ये आणखीन काय नवीन माहिती हवी असल्यास या ब्लॉगच्या शेवटी फीडबॅक फॉर्म दिला आहे त्यात सुचवावी.